नागोठणे : येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आनंद लाड यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाचे पूजन व संविधानाची शपथ घेण्यात आली. भारतीय संविधानाचे धनराज उमाळे यांनी उपस्थितांसमोर वाचन केले.
यावेळी रोहा भाजपा महामंत्री आनंद लाड, नागोठणे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के, जि.प. गण परिषद् अध्यक्ष शेखर गोळे, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, नागोठणे शहर सरचिटणीस तिरथ पोल्सानी, भाजपा शिक्षण सेल अध्यक्ष अशोक अहिरे, भाजपा शिक्षण सेल उपाध्यक्ष धनराज उमाळे, ओबीसी सेल अध्यक्ष अंकुश सुटे, रोहा तालुका भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा अपर्णा सुटे, विभागीय सरचिटणीस सोनाली पडवळ, माजी विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, विवेक रावकर,विहार हेंडे, हेमंत लाड, मोहन लाड, जयराम गोरे, चंद्रकांत गोरे, परशुराम वारगुडे, कुशा वारगुडे, पांडू गोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद लाड यांनी केले. भाजपा कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहिले. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
