विनायक पाटील
पेण : दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा CFI/IB च्या नॉर्वेतील चेअरपर्सन श्रीमती हेगे यांनी नॉर्वेतील भारतभेटीसाठी इच्छुक काही स्पॉन्सर्स यांच्या बरोबरीने एक आठवड्याचा भारत दौरा केला. या भेटीत त्यांनी चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या पेण येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या प्रतिपालीत मुलांचा प्रकल्प व इतर प्रायोजित प्रकल्प याविषयी विस्तृत चर्चा तसेच मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान त्यांनी विविध गावं तसेच ५० प्रतिपालीत मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या व विचारपूसही केली. गावातील लोकांनीही या सर्व मंडळींचे आनंदाने स्वागत केले.

या भेटीदरम्यान त्यांनी या मुलांना नॉर्वेतून आणलेल्या भेटवस्तूही दिल्या. तसेच मुलांनीही आपल्या हाताने बनवलेल्या शोभेच्या वस्तू या अभ्यागतांना भेटी म्हणून दिल्या. सीएफआयचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांचा या सर्व कार्यक्रमासाठी मार्गदर्शक व यजमान म्हणून सहभाग राहिला. तसेच डायरेक्टर्स आणि नॉर्वेतील स्पॉन्सर्स यांनी मुलांना व गावातील इतर लोकांना भेटून खूप आनंद झाल्याचे व्यक्त केले.
