एमआयडीसी अभियंता, प्रांताधिकारी, आरआयएचे अध्यक्षही गैरहजर, गांभीर्य किती? साऱ्यांना पडलाय प्रश्न
शशिकांत मोरे
धाटाव : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीत कंपनीच्या भयानक दुर्घटनेनंतर संबधीत जिल्हा प्रशासन सध्यातरी चांगलेच भानावर आले. मूळात जिल्हाधिकारी सुरक्षा प्रशासन मुख्यतः कंपन्यांतील वाढत्या दुर्घटनांबाबत रोहा स्थानिक तहसील,प्रांत प्रशासन कधीच जागृत नाही.वायू, जलप्रदूषण तक्रारीकडे प्रांत, तहसील प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत आले आहे. त्यातच आता कुंडलिकेतील रासायनिक विषारी सांडपाण्याचा प्रश्न कमालीचा गाजला आहे. यातील धक्कादायक महाडमधील कंपनी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रायगड यांच्या निर्देशान्वये मंगळवारी धाटाव येथील आरआयएच्या सभागृहात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची आढावा बैठक झाली. कंपन्यातील कामगार, पूर्णतः कंपनी, परिसराची सुरक्षा व आरोग्य बाबतच्या महत्त्वाच्या बैठकीला खुद्द प्रांताधिकारी,आरआयएचे अध्यक्ष, एमआयडीसीचे अभियंता, अनेक कंपन्यांचे अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायतीचे काही सरपंच गैरहजर राहिले. त्यामुळे आढावा बैठक निव्वळ औपचारिकता पार पडली. यातून कंपनी संबंधी सुरक्षा, सामाजिक आरोग्य बाबतीत प्रशासन व शासन खुद्द कंपन्यांचे अधिकारी किती गंभीर आहेत, हेच स्पष्टपणे अधोरेखीत झाले तर कंपन्यांच्या वाढत्या दुर्घटना यांसह जल, वायू प्रदूषणाला संबंधीत प्रशासन, कंपन्यांचे अधिकारी हेच अप्रत्यक्ष जबाबदार का ठरू नयेत, याकडे आता खुद्द जिल्हाधिकारी रायगड यांनी लक्ष घालावे अशी मागणी उपस्थितांनी केली आहे.
रोह्यात धाटाव मुख्यतः जिल्ह्यात महाड एमआयडीसीतील कंपन्यांत अनेकदा मोठ्या दुर्घटना घडल्या.महाडमधील ताज्या आग दुर्घटनेत तब्बल १३ कामगारांना प्राण गमवावा लागला, यातून कंपन्यांची सुरक्षा किती राम भरोसे आहे, हे स्पष्ट होते. वारंवार दुर्घटना होऊनही एमपीसीबी, कारखाना निरीक्षक प्रशासन कधीच भानावर येत नाही. संबंधीत अधिकारी कंपन्यांना भेटी देऊन पाहुणचाराची औपचारिकता पूर्ण करतात हे नवे नाही. कंपन्या दुर्घटनांत धाटाव एमआयडीसीही मागे नाही. मागील पाचचार वर्षात अनेक दुर्घटना घडल्या. याआधी साॅल्वे, युनिकेम, रोहा डायकेम, एक्सेल, दीपक नायट्रेड विशेषतः अँथेआमधील मोठी आग दुर्घटना इतिहासात जमा आहे. मागील महिन्यात रोहा डायकेम कंपनीत मोठी दुर्घटना घडली. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांकडे एमपीसीबी, कारखाना निरीक्षक विभाग गांभीर्याने पाहत नाही. त्यातच महाडमध्ये मोठी दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच भानावर आले. याच अनुषंगाने मंगळवारी औद्योगिक सुरक्षा व औद्योगिक संचालनालयाची आढावा बैठक झाली. या बैठकीला सुरक्षा व आरोग्य विभागले उपसंचालक सुनील ठाकरे, एमपीसीबीचे राजेश ऑटी, अप्पर तहसीलदार प्रकाश मेहत्रे, नायब तहसीलदार अमृता सुतार, काही कंपन्यांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक सुरक्षा व औद्योगिक विषयक बैठकीत उपस्थितांना सुनील ठाकरे यांनी अपघात व त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली.बैठकीत सुरक्षा व आरोग्य बाबतचा आढावा ऐवजी प्रशिक्षण सादरीकरणाचा अंदाज आल्याने उपस्थित पत्रकारांनी जोरदार आक्षेप घेतला.कंपन्यांचे वाढते अपघात,जल,वायू प्रदूषण त्यातच कुंडलिकेत बेसुमार सोडत असलेल्या रासायनिक विषारी पाण्याकडे संबधीत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.कुंडलिकेत दूषित रासायनिक पाणी बेधडक सोडला जात आहे.मागील आठवड्यात हजारो मासे मृत्युमुखी पडले.कुंडलिका विषारी दूषित करण्याचा विडा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने उचलले आहे का ? कुंडलिकेत दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित झाला.
कंपन्यातील सुरक्षा व सामाजिक आरोग्य विषयक महत्वाच्या आढावा बैठकीला खुद्द एमआयडीसीचे अभियंता गीते यांसह प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकारी गैरहजर दिसल्याने आरोग्य व सुरक्षाबाबत किती गांभीर्यता आहे हे बैठकीतून समोर आले. वाढते प्रदूषण व कंपन्यांची सुरक्षा बाबतच्या आढावा बैठकीला महत्त्वाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने मंगळवारची आढावा बैठक निव्वळ औपचारिकता ठरली.त्यावर उपसंचालक सुनील ठाकरे यांनी आरोग्य व सुरक्षा विषयांवर एकत्रित काम करू,निकोप सुरक्षित वातावरणाची निर्मिती करू, यापुढे सुरक्षा व आरोग्य विषयांवर मासिक बैठक घेऊ, त्यातून निश्चित फरक दिसेल असे आश्वासित ठाकरे यांनी केल्याने वाढते अपघात व विविध प्रदूषणावर आढावा बैठकीची मात्रा आता कितपत लाभदायक ठरते? हे मात्र समोर येणार आहे.
