• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा कोलाड मार्गांवर एसटीची स्कुल व्हॅनला जोरदार धडक, विद्यार्थी जखमी

ByEditor

Dec 2, 2023

शशिकांत मोरे
धाटाव :
रोहा कोलाड मार्गावर आज पहाटे ६:३० वा.च्या सुमारास दाट धुक्यातून मार्ग काढून ओव्हारटेक करीत असताना एसटी बस चालकाने स्कुल व्हॅनला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या अपघातात शाळेतील विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी डॉ. ध्रुव यांच्या अमृता परीचारिणी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्कुल व्हॅन चालक फिर्यादी नारायण सीताराम भोस्तेकर (रा. हनुमान नगर, रोहा) हा आपल्या ताब्यातील स्कूल व्हॅन टाटा मॅजिक क्र. एमएच ०६ एस ९२७९ मधून शाळकरी मुलांना रोहा बाजूकडून कोलाड बाजूकडे घेऊन जात असताना त्यांचे मागून रोहा बस स्थानकातून येणारी रोहा-तुळजापूर एसटी बस क्र. एमएच.०६ बीडब्लयू ८४४३ वरील चालक ओव्हरटेक करीत असताना त्याचे एसटी बसने स्कुल व्हॅनला मागून जोरदार ठोकर मारल्याने स्कुल व्हॅन रस्त्याखाली उतरून सुदर्शन बस स्टॉपच्या भिंतीवर आदळून अपघात झाला.

या अपघातानंतर स्कुल व्हॅनमधील शालेय विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले. या घटनेत काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. शिद अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!