• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तरुणाईमधील व्यसनाधीनता समाजासाठी धोकादायक

ByEditor

Dec 2, 2023

गणेश प्रभाळे
दिघी :
समाज मनावर सोशल मीडियाचा वाढणारा प्रभाव, उध्वस्त झालेली एकत्र कुटुंब व्यवस्था आणि आयुष्याची ध्येयधोरण ठरवत असताना मनाशी बाळगलेले चुकीचे आदर्श आधुनिक तरुणाईला व्यसनाधीन बनवत आहेत. तरुण वर्गाने कोणतेही चुकीचे व्यसन करू नये . असे प्रतिपादन ॲड. संतोष सापते यांनी केले आहे. विधी सेवा समिती श्रीवर्धन व वकील संघटना श्रीवर्धन यांच्या माध्यमातून गोंडघर येथील अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व जुनियर कॉलेज येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

श्रीवर्धन वकील संघटनेचे ॲड. संतोष सापते, ॲड. मनिष लाड, ॲड. झोहेब शेख यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. तरुण वर्गातील व्यसनाधीनता आणि सायबर क्राईम या विषयावर संतोष सापते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, तरुणांमधील व्यसनाधीनता अतिशय धोकादायक ठरत आहे. आजमितीस तरुण आणि तरुणी या दोन्ही घटकांचे व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहे. स्त्रियांमधील वाढणारी व्यसनाधीनता मन सुन्न करणारी आहे. वाईट व्यसनांचा परिणाम शरीर, मन, आरोग्य या सर्व बाबींसाठी घातक ठरत आहे. तरुणाईमध्ये सोशल मीडियाची क्रेझ आहे. सोशल मीडियावरील आभासी विश्व तरुण वर्गाला सत्य वाटते मात्र, वास्तविक जीवनावर सोशल मीडियाचा अनिष्ट परिणाम जाणवत आहे. विद्यार्थी वर्गाने शालेय अभ्यासासोबत अवांतर वाचन करावे असे संतोष सापते यांनी सांगितले. सदर कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य इमरान शेख, माजी प्राचार्य जावेद शेख, जुबेर शेख, हनीफ शेख, न्यायालयीन कर्मचारी अलोक श्रीवर्धनकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!