• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुलगा झाल्याच्या खुशीत मित्रांना दिलेली पार्टी ठरली शेवटची पार्टी; पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

ByEditor

Dec 2, 2023

मिलिंद माने
महाड :
तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या सावित्री संगमावर पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या एकाचा दम लागून बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.

महाड औद्योगिक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलादपूर तालुक्यातील लोहारे देऊळकोंड गावातील मंगेश पांडुरंग ढवळे वय ३५ हा आपल्या मित्रांसमवेत नडगाव गावाच्या हद्दीत असलेल्या सावित्री संगमावर पार्टी करण्यास आला होता यावेळी पोहण्यासाठी नदीत उतरला असता त्याला दम लागला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबत राजेश शिवाजी शेडगे (वय 28) याने महाड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली असता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मयत मंगेश पांडुरंग ढवळे याला मुलगा झाल्याने त्याने मित्रांना पार्टी देण्यासाठी या ठिकाणी आणले होते. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक व्ही. एस. काळगिरे हे करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!