• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नवनिर्वाचित मुख्याधिकारी जाधव यांच्याबरोबर शहरातील समस्यांवर उरण तालुका मराठी पत्रकार संघाची चर्चा

ByEditor

Dec 6, 2023

प्रतिनिधी
उरण :
उरण नगरपालिका हद्दीतील विविध समस्यांवर आज नवनिर्वाचित मुख्याधिकारी समीर जाधव यांची भेट घेऊन उरण तालुका मराठी पत्रकार संघाने चर्चा केली. त्यावेळी मुख्याधिकारी जाधव यांनी आपण लवकरच त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन पत्रकार संघाला दिले. यावेळी मुख्याधिकारी जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची बदली माथेरान येथे झाल्याने त्यांच्या जागी मुख्याधिकारी म्हणून समीर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नुकताच मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, सदस्य पंकज ठाकूर यांनी आज मुख्याधिकारी समीर जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. प्रथमतः नवनिर्वाचित मुख्याधिकारी जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन पत्रकार संघातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर उरण शहरातील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी आपण नवीन असून येत्या काही दिवसात सर्वांच्या सहकाऱ्यांने त्या नक्कीच सोडविल्या जातील असे आश्वासन पत्रकार संघाला दिले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!