• Sun. Feb 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई गोवा महामार्गावर इनोव्हा कारच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू; चालक फरार

ByEditor

Dec 8, 2023

मिलिंद माने
महाड :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी गावाजवळ इनोव्हा कार चालकाने मोटरसायकलस्वाराला दिलेल्या धडकेमध्ये मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, कार चालक फरार झाला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस संबंधित गाडीचा तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी गावाजवळील उड्डाणपुलाजवळ काल रात्रीच्या सुमारास अशोक हिरो पावशे (वय 49, रा. चांभारखिंड, महाड) व त्यांचे चुलत भाऊ अनिल बाळकृष्ण पावशे हे दोघेजण एमएच ०६ आर ४७५२ या त्यांच्या मोटरसायकलने त्यांचे जवळचे मित्र नितीन चंद्रकांत चव्हाण (राहणार नडगाव) यांच्या उटण्याच्या कार्यक्रमाला जाऊन घरी परतत असताना मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणाऱ्या एमएच १६ एजे ९९०९ या इनोव्हा कारने पावशे यांच्या मोटरसायकलला धडक दिल्याने अशोक पावशे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे चुलत भाऊ हे जखमी झाले आहेत.

मोटरसायकलला धडक देऊन इनोव्हा कार चालक सुसाट वेगात पळून गेला असून याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे तपास करीत आहेत. याप्रकरणी भादंवि कलम 304 अ अन्वये 279, 337, 338 मोटरवाहन कायदा 184,134 अन्वये गुन्हा दाखल केला असून फरारी इनोव्हा कारचा तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!