• Sun. Feb 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नवीन शेवा खाडीत पक्षांची किलबिल!

ByEditor

Dec 8, 2023

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्याच औद्योगिकीकरण झपाट्याने होत असल्याने पाणथळ जागांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे देश परदेशातील फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबर इतर विविध जातींच्या पक्षांनी आपला मोर्चा हा नवीन शेवा ग्रामपंचायत परिसरातील पाणथळ जागांवर वळविला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदर या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना, नागरिकांना, पक्षीप्रेमींना किलबिल तसेच मुक्तसंचार करीत असलेल्या पक्षांचा मनसोक्त आनंद लुटता येतो.

फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्षी हे पक्षी अफगाणिस्तान, इराण, इस्त्रायलमधून मोठ्या संख्येने देशातील विविध पाणथळ जागांवर हिवाळ्याच्या दिवसांत दरवर्षी येतात. त्यातील बरेचसे फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबर इतर विविध जातींचे पक्षी हे हजारो मीटरचा प्रवास करत नवी मुंबई व उरणच्या पाणथळ जागांवर येतात. परंतु या परिसराचा कायापालट झपाट्याने होत असल्याने पाणथळ जागांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत जेएनपीटी बंदराच्या परिसरात मोठ्या संख्येने आढळून येत असलेल्या फ्लेमिंगोच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या उरण तालुक्यातील नवीन शेवा ग्रामपंचायत हद्दीतील पाणथळ जागांवर फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबर इतर विविध जातींच्या पक्षांची रेलचेल सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत अशा फ्लेमिंगो इतर विविध जातींच्या पक्षांच्या मुक्त संचारामुळे व किलबिलीमुळे पक्षी प्रेमींना पर्वणी ठरत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!