• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तीन दिवसांपासून पती बेपत्ता, रस्त्यावर कार दिसली अन्…

ByEditor

Jun 19, 2023

पनवेल : नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १७ मध्ये उभ्या एका कारमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी ही घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नवीन पनवेल सेक्टर १७ या ठिकाणी असलेल्या उत्सव बार समोरील रस्त्यावर सिल्वर रंगाच्या मारुती स्विफ्ट (क्रमांक एमएच ०१ एई ७४९२) मध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. प्रशांत खुशलचंद शर्मा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

गेल्या तीन दिवसांपासून प्रशांत शर्मा हे आपल्या राहत्या घरी गेले नव्हते. ते बेपत्ता होते. त्यामुळे त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती. आज सकाळी सेक्टर १६ येथून आपल्या दुचाकीवरून सेक्टर १७ येथे जात असताना त्यांना कार उत्सव बार समोर उभी असलेली आढळली. त्यामुळे तिने आत डोकावले असता प्रशांत हे ड्रायविंग सीटवर आडवे अपडले असल्याचे आढळून आले. मोठ्या प्रयत्नाने गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर प्राथमिक तपासणीत ते मृत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी तात्काळ दखल होत घटनास्थळी धाव घेतली. घटनेची प्राथमिक चौकशी करून त्याचा मृत्यू का आणि कशामुळे झाला याचा शोध सुरू केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!