• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोलाड विभाग कुणबी समाजाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर उत्साहात

ByEditor

Jun 19, 2023

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा विभागीय ग्रुप कोलाड यांच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच मार्गदर्शन शिबिर कै. द. ग. तटकरे विद्यालय कोलाडच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आला. विभागातील इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोलाड विभागीय कुणबी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर प्रा. सुनील देवरे, डॉ. सागर सानप, आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेश महाबळे, कोलाड पोलिस निरीक्षक साबळे, कोलाड हायस्कूलचे प्राचार्य शिरीष येरुणकर, मराठी उद्योजिका नीलम कदम, महाबळे मॅडम, सौ. निलेकर, कोलाड विभागीय अध्यक्ष संदेश लोखंडे, राजेश कदम, चंद्रकांत लोखंडे, दिवाण सानप, महेश ठाकूर, नरेश बिरगावले यांच्यासह मान्यवर तसेच विद्यार्थी, पालक व कोलाड विभागातील कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

रविवारी १८ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यावेळी प्रा. सुनील देवरे, डॉ. सागर सानप, पोलिस निरीक्षक साबळे, राजेश कदम यांनी विद्यार्थ्याना पुढील शिक्षण घेण्यासाठी तसेच त्यांच्या करिअरबद्दल सखोल मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती व गणेश पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज व कुणबी समाज नेते माजी आमदार पा. रा. सानप यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

अभूतपर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बिरगावले यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश ठाकूर यांनी मानून या कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार घेऊन करण्यात आली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!