• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव बसस्थानकातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण!

ByEditor

Dec 12, 2023

सलीम शेख
माणगाव :
माणगाव बसस्थानक येथून एका अल्पवयीन १५ वर्षीय मुलीला आरोपीने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद अपरहित मुलीच्या नातेवाईकांनी माणगाव पोलीस ठाण्यात सोमवार दि. ११ डिसेंबर रोजी दिल्यावर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी यांची १५ वर्षाची अपरहित नात तिचे वर्णन रंग गोरा, अंगाने मध्यम, केस काळे लांब, अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात काळ्या रंगाची चप्पल, पाठीवर काळ्या रंगाची बॅग हिला आरोपी सागर सखाराम कोळी रा. पाथरशेत आदिवासीवाडी ता. रोहा याने तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन तिला फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गुन्हा. रजि.नं. ३५९/२०२३ भादंवि संहिता कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आघाव हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!