वैभव कळस
म्हसळा : गेल्या अनेक वर्षांपासून अपघात प्रवणक्षेत्र ठरलेल्या घोणसे घाटात बुधवार, दि. २० डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्री सुमारे साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या ट्रक नं. एमएच ०६ बीएफ २८३१ ला भीषण अपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले.
मुंबईहुन सिमेंट सायलो बल्कर घेऊन श्रीवर्धनकडे जाणाऱ्या ट्रकच्या ड्राइव्हरचा घोणसे घाटातील धबधब्या जवळील उतारावर ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी होऊन ट्रकचा ड्राइव्हर विष्णू पालावे (रा. फतेपुर )आणि क्लीनर बिपीनकुमार (रा. फतेपुर) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर म्हसळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील इलाजासाठी पाठविण्यात आले. सदर गुन्हा म्हसळा पोलीस ठाण्यात नोंदविला असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल एस. डी. पलोदे यांनी दिली.