• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

ByEditor

Jun 21, 2023

गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांचा झाला हिरमोड!

किरण लाड
नागोठणे :
येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नागोठणे ग्रामपंचायती हाॅलमध्ये पार पडला. यावेळी काही प्रभागामध्ये आरक्षण बदल झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या इच्छूकांचा हिरमोड झाला आहे. या सोडतीवेळी प्रभागातील इच्छुक उमेदवारांबरोबर मोठ्या प्रमाणावर विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

६ प्रभागातील १७ जागांसाठीचे आरक्षण पुढीलप्रमाणे :

प्रभाग जाहीर आरक्षण
प्रभाग क्रमांक एकसर्वसाधारण महिला 2, सर्वसाधारण पुरुष 1
प्रभाग क्रमांक दोननागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 1, सर्वसाधारण महिला 1,
सर्वसाधारण पुरुष 1
प्रभाग क्रमांक तीननागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 1, सर्वसाधारण पुरुष 1
प्रभाग क्रमांक चारनागरिकांचा मागास प्रवर्ग 1, सर्वसाधारण महिला 2
प्रभाग क्रमांक पाचनागरिकांचा मागास प्रवर्ग खुला १, अनुसूचित जाती १,
सर्वसाधारण १
प्रभाग क्रमांक सहा अनुसूचित जमाती १, सर्वसाधारण महिला २

अशा एकुण १७ जागांसाठी प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम अध्यक्ष मंडल अधिकारी भरत सावंत, पाटणसई तलाठी सचिन साबरी, नागोठणे तलाठी गणेश विटेकर, नागोठणे ग्रामसेवक राकेश टेमघरे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या आरक्षण सोडतीबाबत काही हरकत असेल त्यांनी दि. 23 ते 30 जुन या कालावधीत मा. तहसीलदार रोहा यांच्याकडे तक्रार करावी असे सांगण्यात आले आहे. या सोडतीमध्ये इच्छुक उमेदवारांचे प्रभाग आरक्षण बदलले गेल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कहीं गम, कहीं खुशी असे चित्र पाहायला मिळत होते.

शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडतीच्या वेळी विविध पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते, परंतु यावेळी प्रमुख पक्षाचे नेते मंडळी उपस्थित का राहिले नाही? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!