• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांना राज्यस्तरीय ‘कुलाबा जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

ByEditor

Dec 31, 2023

प्रतिनिधी
उरण :
उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते येत्या बुधवार दि. ३ जानेवारी रोजी आदय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जंयती दिनी सन्मानित करण्यात येणार आहे.

भाई जगताप मित्र मंडळ रायगड काँग्रेस सेवा फाऊंडेशन रायगड मधुशेठ चॅरीटेबल ट्रस्ट रायगड आणि शिवकला मित्र मंडळ रायगडच्या संयुक्त विद्यामाने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून यंदाचे १३ वे वर्ष असल्याचे संयोजक जिल्हा अध्यक्ष अॅड उमेश ठाकूर यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. गेले २५ ते ३० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात दैनिक वादळवारा, दैनिक कृषिवल, दैनिक रायगड टाईम्स, दैनिक नवाकाळ, दैनिक प्रहार, दैनिक किल्ले रायगड, दैनिक जनमत आदी वृत्तपत्रात काम करीत आहे व साप्ताहिक प्रांजल वृत्तपत्र गेली १० वर्षे चालवीत आहेत. तसेच अनेक सामाजिक संघटनेच्या मार्फत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी आपल्या निर्भीड लेखणीने अनेकांचा भ्रष्ट कारभार उघड केला आहे. ते उरण तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्षस्थान सांभाळत आहेत.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजमान्स स्वस्थ आणि जिवंत राखण्याचे काम या स्तंभाचा वसा घेणारे पत्रकार करीत असतात. पत्रकारितेचे व्रत हे गेली अनेक वर्षे अविरत, अखंडपणे आणि ते देखील निर्भीडपणे आपण सांभाळीत आहात. त्याचे काळात आपण आपली पत्रकारितेचा आजही त्याच पद्धतीने सुरू ठेवली आहे.

त्यांच्या या निर्भीड लेखनामुळे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांना पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना दैनिक रायगड टाईम्स, द्रोणागिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पत्रकारितेतील सन २०२४ चा राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल पत्रकार घनश्याम कडू यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सदर पुरस्कार बुधवार दि.३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सातीर्जे मैदान अलिबाग रायगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता प्रदान करण्यात येणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!