वैभव कळस
म्हसळा : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी गर्भगृहामध्ये पुजन करण्यांत आलेले अक्षता कलशाचे म्हसळा शहरात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मंगल अक्षता कलशांचा दर्शन सोहळा श्रीराम मंदिर म्हसळा येथे आयोजित करण्यात आला होता.
विश्व हिंदू परिषदेच्या आदेशानुसार श्रीराम जन्मभूमी कार्यक्रम म्हसळा हिंदू समितीतर्फे आयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अक्षतांचे वितरण मंगळवार, दि. २ जानेवारी २०२४ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत श्रीराम मंदिर येथे उत्साही वातावरणात करण्यात आले. तसेच २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार असल्याची माहिती पंडित महेश जोशी, सुनिल उमरोठकर यांनी दिली. पंडित महेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष नंदू गोविलकर, वंदना गोविलकर यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. याप्रसंगी यतीन करडे, नगरसेवक मुन्ना पानसरे, दादा पानसरे, दिलीप करंबे, भालचंद्र करडे, प्रशांत निजामपूरकर, समीर दिवेकर, गौरी पोतदार, सरिता पानसरे, नयना बिरवाडकर, योगेश करडे, सुरेश जैन, निलेश करडे, वासंती म्हशीलकर, सुशील यादव, सौरभ गोरेगावकर, नगरसेविका राखी करंबे, नगरसेवक निकेश कोकचा, गौरव पोतदार, सुनिल उमरोठकर, शालिनी गोविलकर, राधिका म्हशीलकर, माजी नगरसेविका संपदा पोतदार, प्रसाद पोतदार, गौरव पोतदार, मनाली कुडेकर, कल्पिता करडे, अनिशा करडे, भाविका पोतदार, वच्छीताई पाटुकले, दिनेश म्हशीलकर, सुधीर करडे, मंगलाकाकी सावंत, शोभा म्हशीलकर आदि मान्यवर उपस्थित होते.