घन:श्याम कडू
उरण : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या १९८४च्या गौरवशाली शेतकरी आंदोलनामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पहिली गोली झेलणाऱ्या रेखाताई भोइर ह्या शेवा (ता. उरण) गावच्या रणरागिणी सोमवार, दि. १ जानेवारी रोजी काळाच्या पडद्याआड़ गेल्या.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९८४चे आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनात ५ हुतात्मे झाले होते. या आंदोलनाची नोंद जगभरात झाली आहे. अशा या गौरवशाली आंदोलनात सहभागी झालेल्या रेखाताई भोईर या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पहिली गोळी लागून जखमी झाल्या होत्या. अशा ह्या रणरागिणी रेखाताई भोईर यांचे सोमवार, दि. १ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
यावर्षी आंदोलनाचे हे ४० वे वर्षे आहे. आंदोलनातील या रणरागिणी महिलेच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातून आदरांजली वाहिली जात आहे.