• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्यातील मराठी पाट्यांकरिता मनसे आक्रमक!

ByEditor

Jan 3, 2024

लवकरात लवकर पाट्या न बदलल्यास तीव्र आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन

प्रतिनिधी
नागोठणे :
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील दुकानांवर पाट्या मराठी भाषेत कराव्या असा निर्णय दिला. मात्र असं असताना देखील नागोठणे शहरातील काही व्यापारी याला जुमानत नसल्याचं समोर आलं आहे. व्यापारीवर्ग ठळक मराठी भाषेत पाट्या लावताना दिसत नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पवित्रा घेत लवकरात लवकर जर दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत दिसल्या नाहीत तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांच्याकडून देण्यात आला आहे.

नागोठणे शहरातील दुकानावरील पाट्या लवकरात लवकर मराठीत करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तालुक्याच्यावतीने तीव्र आंदोलन करेल असे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदार डॉ. किशोर देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांना देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, रोहा तालुका महिला सेना अध्यक्षा दिपश्री घासे, माथाडी सेना विभाग अध्यक्ष नरेश भंडारी, महाराष्ट्र सैनिक किशोर कापसे, सचिन नेरपगार, लोचन तुपकर, कल्पेश मळेकर उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!