• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धुतुम ग्रामस्थांचे आयोटीएल कंपनीसमोर गेटबंद आंदोलन

ByEditor

Jan 5, 2024

घन:श्याम कडू
उरण :
आयोटीएल कंपनीमध्ये स्थानिकांची नोकरभरती करण्यासाठी धुतुम ग्रामपंचायत आंदोलन केले होते. त्यावेळी कंपनी प्रशासनाने नोकर भरती करण्याचे मान्य केले होते. परंतु भरती करण्याच्यावेळी कंपनी प्रशासनाने नकार दिल्याने ग्रामस्थांनी त्वरित गेट बंद आंदोलन सुरू केले आहे.

धुतुम ग्रामपंचायत हद्दीतील आयोटीएल कंपनीत स्थानिकांना सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. परंतु कंपनी प्रशासन जुमानत नसल्याने आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत कंपनी प्रशासनाने नोकर भरती करण्याचे मान्य केले होते. आज प्रत्यक्षात नोकरभरती करताना कंपनी प्रशासनाने नकार देतात धुतुम ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटसमोर गेट बंद आंदोलन सुरू केले होते. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी धुतुम ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली इंडियन ऑईल अदानी वेंचर्स कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गेट बंद आंदोलन केले.या आंदोलनामुळे कंपनीतील द्रव पदार्थ व रसायनांच्या टॅकरची वाहतूक सुमारे तीन तास बंद पडली.यावेळी कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत असताना आमदार महेश बालदी यांच्याही विरोधातही स्थानिकांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर पोलिसांनी २० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.यामध्ये महिला सरपंच सुचिता ठाकूर यांच्यासह ४ महिला सदस्याआणि तीन सदस्यांचा समावेश असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

याप्रकरणी ग्रामस्थांशी लवकरच चर्चा करून कंपनीचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर व सदस्य प्रेमनाथ ठाकूर यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!