घन:श्याम कडू
उरण : उरण नगरपालिका हद्दीत परप्रांतीयांची मक्तेदारी वाढली आहे. नगरपालिका नाल्यावरच फेरीवाल्यानी आपली दुकाने थाटून कब्जा केला आहे. याकडे प्रशासन सरळसरळ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांनीही अशा प्रकारे नगरपालिका जागेवर कब्जा केला आहे.
उरण नगरपालिका हद्दीत परप्रांतीय फेरीवाल्यानी नगरपालिकेच्या जागेवर आपल्या मालकीची समजून आपली छोटीमोठी व्यवसाय थाटला आहे. यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. काही नगरपालिका कर्मचाऱ्यांनीही नगरपालिकेच्या मोक्याच्या जागेवर कब्जा करून त्या भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे या फेरीवाल्यावर कारवाई कोणी करायची असा सवाल उपस्थित होत आहे.
यामूळे शहरात नाक्यांनाक्यांवर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तसेच नागरिकांना पायी चालणेह कठीण बनले आहे. याबाबत नगरपालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे.