• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवसमर्थ स्मारकाजवळ निर्माण झाला पार्किंग प्लाझा? दासभक्तांमध्ये नाराजीचा सूर

ByEditor

Jan 5, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसमर्थ स्मारकाजवळील रस्त्यावर बेधडक वाहन चालक आपआपली वाहने राजरोसपणे पार्किंग करुन ठेवत आहेत. त्यामुळे जेएनपीए बंदर परिसरातील दास्तान फाटा येथील परिसर पार्किंग प्लाझा झाला आहे की काय? अशा प्रकारचा नाराजीचा सूर दासभक्त व्यक्त करत आहेत.

जेएनपीए बंदर व्यवस्थापनाने करोडो रुपये खर्च करून दास्तान फाटा येथील रस्त्याजवळ लाखो दासभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसमर्थ स्मारकांची उभारणी केली. या शिवसमर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा वर्षांपूर्वी पार पडला. मात्र, जेएनपीए बंदर व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे सदर शिवसमर्थ स्मारकांचे दर्शन घेण्यासाठी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढताना दिसत नाही. त्यात शिवसमर्थ स्मारकांच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावरच वाहनचालक आपआपली वाहने राजरोसपणे बेधडक पार्किंग करुन ठेवत आहेत. त्यामुळे दासभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!