श्रीगांव धरण परिसरात राबविले स्वच्छता अभियान
प्रतिनिधी
अलिबाग : श्रीगाव धरण परिसरात प्लॅस्टिक व फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. हे त्याच परिसरात राहणारे रोट्रॅक्ट क्लब मेंबर्स हर्षवर्धन पाटील यांच्या लक्षात आले त्यांनी याबद्दल रोट्रॅक्ट क्लबमध्ये माहिती देऊन स्वच्छता अभियान राबवण्याचे सुचवले. यावर रोट्रॅक्ट क्लबच्या सर्व सदस्यांनी एकमताने सहमती देऊन रविवारी सकाळी श्रीगाव धरण येथे स्वच्छता अभियान मोहीम हाती घेतली. यामध्ये जवळपास 25 ते 30 रोट्रॅक्टर सदस्य सहभागी होऊन श्रीगाव धरण परिसरातील प्लॅस्टिक व काचा गोळा करण्याचे काम पूर्ण केले. त्या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.

यावेळी क्लबचे नियोजित अध्यक्ष ऋषिकेश पाटील यांनी क्लबच्यावतीने येणाऱ्या पर्यटकांना आपण सोबत आणणारे प्लास्टिक बाटल्या, काचेच्या बाटल्या इतरत्र न फेकता व न फोडता एका ठिकाणी गोळा करण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नवीन पर्यटकांना व ग्रामस्थांना याचा त्रास होणार नाही तसेच निसर्गाला कोणत्याही प्रकारे धोका पोहोचणार नाही आणि या धरणाचे सौंदर्य असेच निरंतर काळ टिकून राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रो. डॉ. निलेश पाटील, रो. अंकुश पाटील, परेश पाटील, रोट्रॅक्टर तेजस, प्रतीक, विद्या, शशांक, सृष्टी, स्नेहा, संकेत, प्रतीक, अनिकेत, ऋषी, अथर्व, रोशनी, अमृता, रितिका, अनुष्का, हर्ष, आयुष आदी व इतर सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली व ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.