• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोळघर येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचे आयोजन

ByEditor

Jan 8, 2024

प्रतिनिधी
पोयनाड :
अलिबाग तालुक्यातील कोळघर येथे काल प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचे आयोजन मंडळ अधिकारी कार्यालय पोयनाड तर्फे करण्यात आले होते.

देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता मा.प्रधानमंत्री जनमन या योजनेच्या अंमलबजावणी बाबत रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण व तहसिलदार अलिबाग विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. ८ जानेवारी २०२४ रोजी मौजे कोळघर आदिवासीवाडी ता.अलिबाग येथे प्रभारी मंडळ अधिकारी चरी महेश निकम तसेच तलाठी ताडवागळे हेमांगी धोद्डे व इतर मंडळातील तलाठी व कर्मचारी यांनी मेळावा आयोजित करून शासकीय दाखले आधारकार्ड, उत्पन दाखला, वयअधिवास दाखला, जातीचा दाखला, ७/१२ उतारा वाटप व इतर शासकीय दाखले वाटप करण्यात आले.

सादर कार्यक्रमात ४७ अधिवासी बांधवाना लाभ देण्यात असून तसेच पुढील काही दिवसात मंडळ चरी व पोयनाड येथील आदिवासी वाड्यांवर सदर मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. सदरच्या मेळाव्या मार्फत आदिवासी समाजास जास्तीत जास्त लाभ देण्याचा संकल्प आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!