• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून नार्वेकरांच्या पक्षपाती निर्णयाचा निषेध

ByEditor

Jan 12, 2024

शशिकांत मोरे
धाटाव :
सुमारे दीड वर्ष सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात निकाल देऊन शिंदे गट हेच खरी शिवसेना आहे, तसेच शिंदे गटाचे १६ आमदारांना अपात्र न करता सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्याने संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने केली. याचेच पडसाद रोह्यात उमटले आणि रोठबुद्रुक शाखेसमोर असंख्य शिवसैनिकांनी नार्वेकर यांचा जाहीर निषेध केला.

यावेळी रोहा उपतालुका प्रमुख महादेव साळवी, रोहा शहर प्रमुख दीपक तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली रोठ बुद्रुक शाखेसमोर सर्व शिवसैनिक एकत्र जमले होते. यावेळी काळे झेंडे दाखवून राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीचा कोणताही आधार न घेता राहुल नार्वेकर यांनी पक्षपातीपणा आणि भाजपची सुपारी घेऊन आमदार पात्रतेवर निकाल दिला आहे. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे असल्याने शिंदे गट आणि राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर हा निशाणा भाजपने साधला आहे. परंतु, ठाकरेंची शिवसेना ही महाराष्ट्रातील सामान्य मतदारांपर्यंत पोहोचली आहे असे महादेव साळवी म्हणाले. तर जरी आमदार खासदार हे फुटले असतील तरी कट्टर शिवसैनिक मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. भाजपची हुकूमशाही या निवडणुकीत जनता मोडून काढणार आहे, असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख दीपक तेंडुलकर यांनी व्यक्त केला.

यावेळी रोहा उपतालुका प्रमुख महादेव साळवी, श्रीवर्धन मतदार संघ अधिकारी राजेश काफरे, शिवसेना धाटाव विभागप्रमुख नितीन वारंगे, रोठ बुद्रुक शाखा प्रमुख निलेश वारंगे, उपशाखा प्रमुख महेश खांडेकर, ग्राहक संरक्षण रोहा तालुका प्रमुख अनिश शिंदे, धाटाव महिला संघटिका रोहिणी गोसावी, सुप्रिया वारंगे, तसेच शिवसैनिक प्रकाश वालीवकर, संजय देऊळकर, दुर्गेश नाडकर्णी, यशवंत गोसावी, भारत वाकचौरे, आदित्य कोंडाळकर, राम महाडिक, मनोज लांजेकर, आनंद भुवड, संकेत जाधव, नरेश गायकर, संकेत भोसले, गणेश कदम, किसन खोत, नवनीत ठाकूर यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!