• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दहिवली ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी नरेश कालेकर १ मताने विजयी

ByEditor

Jan 12, 2024

गणेश पवार
कर्जत :
तालुक्यातील दहिवली ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच अदेश धुळे यांनी १५ दिवसापूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पाडली. त्यामध्ये भुमिका योगेश भोईर व नरेश कालेकर यांचे दोन अर्ज असल्याने या दोघांमध्ये निवडणूक पार पडली. दोन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत भुमित्रा भोईर यांना ६ मते पडली आणि नरेश कालेकर यांना ७ मते पडली. एका मताने नरेश कालेकर विजयी झाले. सरपंच मेघा अमर मिसाळ, ग्रामसेवक सीमा राठोड यांनी निवडणुकीचे काम पाहिले.

महाविकास आघाडीचे नरेश कालेकर यांची ग्रुप ग्रामपंचायत दहिवली उपसरपंच पदी निवड झाली आहे. या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी
कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ, बंधू गायकवाड, सुनील विरले, निलेश विरले, मंगेश मोघे, गजानन दबडे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत भंवारे आदेश धूळ, महेंद्र मोगरे, लक्ष्मण वाघमारे, भुमित्रा भोईर, सोनम गायकवाड, स्वाती विरले, रोहनी विरले, मानसी तरे, वनिता जामघरे आणि रूपेश मिसाळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!