• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची निदर्शने

ByEditor

Jan 12, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा गेल्या दिड महिन्यांपासून संप सुरु आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत संपावर असलेल्या सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावून 24 तासात कामावर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र याला शुक्रवारी (दि. 12) सेविका, मदतनीस यांनी लेखी उत्तर देत संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

रायगड जिल्हाप्रमुख जिविता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग पंचायत समितीच्या कार्यालयासमोर एकत्र येत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी निदर्शने केली. त्यानंतर अलिबाग प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे नोटीसांना लेखी उत्तर देण्यात आले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा संप सुरु आहे. संपाला दिड महिना झाला. तरी अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांना पूरक पोषण आहार, शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण आहार, आरोग्य तपासणी, विविध लसीकरण आदी सेवा पुरवल्या जातात ज्या सेवा संपामुळे दिड महिन्यांपासून बंद आहेत. या संपावर तोडगा निघने गरजेचे होते. मात्र तोडगा न निघाल्याने राज्य शासनाने उलट संपावरील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 24 तासात कामावर हजर रहावे, अन्यथा कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल असे कळविले आहे. प्रशासनाने दिलेल्या नोटिसांमुळे संपावरील सेविका आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी लेखी उत्तर देत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!