• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्या

ByEditor

Jan 13, 2024

मिलिंद माने
महाड :
शहरातील काकरतळे परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी रात्री उघड झाले. ज्या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते तिचे लग्न ठरल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या प्रसिद्ध व्हाईट हाऊस या इमारतीमध्ये विनायक बद्रीनाथ फुके (वय २५, मूळ राहणार अंजनी बुद्रुक, मेहकर बुलढाणा) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. गावात राहणाऱ्या एका मुलीबरोबर त्याचे गेली पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते मात्र या मुलीचे लग्न ठरल्यामुळे मयत विनायक हा अस्वस्थ होता यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचे महाड शहर पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात देवेश विजय शहा यांनी खबर दिली असून याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची रजिस्टरवर नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास महाड शहर पोलीस करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!