वैभव कळस
म्हसळा : शिवसेना ठाकरे गटाचे माजी युवासेना शहर अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर यांनी आपल्या समर्थकांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
आक्रमक स्वभाव अशी ओळख असणाऱ्या प्रसन्ना निजामपूरकर यांचा पक्षात प्रवेश घेऊन त्यांना शहरप्रमुख पदाची जबाबदारी सुद्धा या कार्यक्रम प्रसंगी देण्यात आली. प्रसन्ना निजामपुरकर यांचा भाजप प्रवेशामुळे शिवसेना उबाठा गटाला शहरात मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. त्यांच्या समवेत विक्रांत निजामपूरकर, रुपेश शिगवण, हर्षद पोतदार, प्रीतम, निखिल रिकामे, सम्राट करंबे, ऋषिकेश बोरकर, सिद्धेश पातूकले यांनी सुद्धा प्रवेश केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे समाजातील सर्व घटकांसाठी विकास योजना राबवण्यात येत आहेत. त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार तसेच म्हसळा शहरात पक्ष वाढीसाठी भर देणार असल्याचे नवनियुक्त शहराध्यक्ष निजामपूरकर यांनी सांगितले.