• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का; खंद्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ByEditor

Jan 19, 2024

किरण लाड
नागोठणे :
येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खंदे कार्यकर्ते सुदेश येरुणकर व प्रमोद नागोठणेकर यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला आहे.

गेली अनेक वर्षे नागोठणे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यात मोलाचा वाटा असणारे शिवसेनेचे नेते किशोर जैन यांचे खंदे समर्थक तसेच वाॅर्ड क्रं. 4 चे शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते सुदेश येरुणकर व प्रमोद नागोठणेकर यांनी शिवसेनेतील राजकारणाला कंटाळून भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी ज्यांनी ही किमया साधली ते भाजपचे पेण विधानसभेचे अध्यक्ष प्रसाद भोईर यावेळी उपस्थित होते. या पक्ष प्रवेशा वेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, रोहा तालुका माजी उपाध्यक्ष अंकुश सुटे, रोहा तालुका शिक्षण सेलचे उपाध्यक्ष धनराज उमाळे, भाजपचे माजी नागोठणे विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, भाजपचे जेष्ठ नेते विवेक रावकर, शेखर गोळे तसेच तिरतराव पोलसानी उपस्थित होते.

मी गेली अनेक वर्षे नागोठणेमध्ये शिवसेना पक्षाचे काम करीत आहे. नागोठणे तसेच केएमजी विभागात सामाजिक कार्य करीत असताना शिवसेना पक्ष वाॅर्ड क्रं. 4 मध्ये वाढविण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये वाॅर्ड क्रं. 4 मध्ये गेली अनेक वर्षे शिवसेनेचे सदस्य निवडून आणण्यात आम्ही मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु नागोठण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी सातत्याने आमच्याकडे दुर्लक्ष केले. भाजपचे पेण विधानसभेचे अध्यक्ष प्रसाददादा भोईर यांचा कामाचा झंझावात बघून त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून मी व माझे सहकारी सुदेश येरुणकर भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील यांच्या उपस्थित आज त्यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

-प्रमोद नागोठणेकर

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!