• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

न्हावा शेवा पोर्टमध्ये चालकांना मारहाण होत असल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीवर पोलीसांची कारवाई (व्हिडीओ समाविष्ट)

ByEditor

Jan 18, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
एका अनोळखी इसमाने न्हावा शेवा पोर्ट, रायगड येथे एका सरपंचाच्या मुलाचा अपघात झाल्यामुळे त्याने १११ चालकांना मारण्याची शपथ घेतली आहे, चालकांना दिसेल तिथे कापुन टाकले जात आहे, आतापर्यंत १५ ते २० चालकांना मारून टाकलेले असुन पोलीस देखील चालकांची मदत करत नाहीत. चालकांनी न्हावा शेवा पोर्टकडे जावु नये अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती टाकलेला होता. सदरच्या व्हायरल व्हिडीओमुळे ट्रेलरचालक व ट्रान्सपोर्टर्समध्ये भीती निर्माण झाली होती. सदरची बाब ही पुर्णपणे खोटी व खोडसाळपणे ती सोशल मिडीयाच्या माध्यमातुन व्हायरल केली जात असल्याने त्याबाबत न्हावा शेवा पोलीस ठाण्यामध्ये सदरचा व्हिडीओ बनविणाऱ्या अनोळखी इसमाच्या विरोधात दिनांक १३/१/२०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा २००१ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

न्हावा शेवा पोर्टमध्ये दररोज हजारो ट्रेलर वाहनांची व्यवसायिक दृष्टिकोनातुन आवक जावक होत असते. सदरच्या खोट्या व्हिडीओमुळे पोर्टमध्ये येणाऱ्या ट्रेलरचालकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाल्यामुळे सदरच्या आरोपीचा शोध घेवुन त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पनवेल पंकज डहाणे यांनी आदेश दिले होते. सदरप्रकरणी सहा. पोलीस आयुक्त पोर्ट विभाग धनाजी क्षीरसागर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, पोलीस हवालदार वैभव शिंदे, विशाल हिंदोळा, दयानंद कवलगीर, जितेंद्र दबके व राम राठोड यांच्या पथकाने आरोपी पंकज रामजी गिरी रा. वडोदरा, गुजरात या आरोपीस त्याच्या वडोदरा, गुजरात येथील कार्यालयातुन ताब्यात घेतले असुन त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालु आहे.

तपासामध्ये आरोपीने त्याला मिळालेल्या ऐकीव माहितीच्या आधारे सदरची अफवा पसरवलेली होती असे समोर आले असुन त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. न्हावा शेवा पोलीस ठाण्याकडुन सर्व ट्रेलरचालकांना कोणत्याही अफवेवरती विश्वास न ठेवता कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी ११२ या क्रमांकावरती संपर्क करण्याचे आवाहन पंकज डहाणे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पनवेल, नवी मुंबई यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!