• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रसाद सावंत यांचा शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा; कुलदीप जाधव नवे शहरप्रमुख

ByEditor

Jan 19, 2024

गणेश पवार
कर्जत :
माथेरानमधील राजकारणातील तरुण नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख प्रसाद सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. सर्व पदे घराण्यात नको म्हणून प्रसाद सावंत यांनी राजीनामा दिल्याचे समजते.

मागील निवडणूकीत आपल्या संपर्क प्रमुख पदाचा करिश्मा दाखवत माथेरान नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून १७ पैकी १४ जागा निवडून आणल्या होत्या. त्यामध्ये प्रसाद सावंत हे स्वतः नगरसेवक म्हणून आणि त्यांच्या पत्नी प्रेरणा सावंत या नगराध्यक्ष म्हणून निवडून गेले होते. तद्नंतर शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर प्रसाद सावंत यांची वर्णी शहरप्रमुख पदी लागली होती. मात्र सर्व पदे माझ्या घरात नको म्हणून त्यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतर त्यांनीच कुलदीप जाधव यांची शहरप्रमुख पदाची नेमणूक करावी अशी शिफारस केल्याचे समजते. त्यामुळे माथेरान शिवसेना शहरप्रमुख पदी क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक कुलदीप जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रसाद सावंत यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मी जरी शिवसेना शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी मी शिवसेनेचा एक निष्ठावन्त कार्यकर्ता म्हणून उध्दव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे काम करत राहणार असून इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा मी विचार करूच शकत नाही.

कुलदीप जाधव यांनी क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष पदाची धुरा अत्यंत प्रभावीपणे सांभाळली होती. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा असल्याने त्यांची नियुक्ती झाल्यामुळे फक्त मराठा समाजचं नव्हे तर इतर समाज बांधवांनी सुद्धा सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. याबाबत कुलदीप जाधव म्हणाले की, ही जबाबदारी खूप मोठी असून सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी दिवसरात्र एक करणार असून शिवसेना वाढीसाठी योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!