• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण सोनाली राजेंद्र तेटगुरे हिचा सत्कार

ByEditor

Jan 20, 2024

प्रतिनिधी
माणगाव :
तालुक्यातील मूळ ढालघर गावची रहिवासी असणारी व सध्या माणगाव वाकडाई नगरात राहणारी सोनाली राजेंद्र तेटगुरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन तिने ओबीसी प्रवर्गात संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या पाच क्रमांकात येण्याचा मान मिळविला.

या उज्वल यशाबद्दल माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सोनाली राजेंद्र तेटगुरे हिचा शनिवार, दि. २० जानेवारी रोजी संघाचे अध्यक्ष सलीम शेख, ज्येष्ठ मार्गदर्शक खेमचंद मेथा, कार्याध्यक्ष मजिद हाजिते, सल्लागार प्रभाकर मसुरे आदींनी तिच्या माणगाव वाकडाई नगर येथील निवासस्थानी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सोनालीचे वडील राजेंद्र तेटगुरे, आई रश्मी तेटगुरे, कृषी अधिकारी प्रमोद देशमुख, सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर पालकर, बाळ उभारे, रमेश केकाणे, गणपत पालकर, काशीराम पालकर, नंदू खाडे, संजय खाडे, गणेश शिंदे, उत्तम कदम, नातेवाईक व मित्रमैत्रिणी परिवार उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!