• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ज्ञानांकुर इंग्लिश स्कूल खांब येथे देशाचा ७५वा प्रजाकसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

ByEditor

Jan 27, 2024

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यातील खांब विभागातील इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश स्कूल खांब येथे देशाचा ७५वा प्रजाकसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

देशाचे ७५व्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त या शाळेचे ध्वजारोहण खांब विभागातील सामजिक कार्यकर्ते संस्थेचे संचालक रामचंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हभप नारायण महाराज लोखंडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, उपाध्यक्ष सुधीर लोखंडे, खजिनदार डॉ. श्याम लोखंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरज कचरे, दिलीप मोहिते, स्कूल कमितीचे अध्यक्ष सूरज कचरे ,रोहिदास भोईर, प्रकाश कोकाटे, अमित भोईर, सूर्यकांत पोटफोडे, सुशील कान्हेकर ,प्रदीप मरवडे, मंगेश महाबळे, बाळा शिंदे, सचिन गोळे, नितीन कचरे, नथूराम जाधव, विशाल मोहिते, अनुपमा चितळकर, प्रणाली धनावडे, अर्चना परबळकर, प्रीती लोखंडे आदी मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

शुक्रवारी २६ जानेवारी रोजी देशाच्या ७५व्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून विविध कला सादर करत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रजाकसत्ताक दिनाबद्दलचे महत्व पटवून दिले. तसेच विविध कला सादर केली. तर यावेळी डॉ. श्याम लोखंडे, सूरज कचरे, संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आर्या लोखंडे, कनिका कचरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका ऋतुजा पवार, प्रतिक्षा धामणसे, शुभदा भालेकर, प्रज्ञा माने, स्नेहा मोहिते, नवनिता देवकर, विनायक माहीत आणि मदतनीस श्रुती वाजे यांनी अथक परिश्रम घेतले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!