प्रतिनिधी
नागोठणे : ७५व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ नागोठणे यांच्यातर्फे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख तथा माजी जिल्हापरिषद सदस्य किशोरशेठ जैन व नवनार्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

७५व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या स्व. शैलेंद्र देशपांडे सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख तथा माजी जिल्हापरिषद सदस्य किशोरशेठ जैन व नवनार्वाचित ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अखलाख पानसरे, सर्व नवनिर्वाचित सदस्य यांचा ज्येष्ठ नागरिक संघ नागोठणे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राविकास अधिकारी राकेश टेमघरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे महादेवसिंग परदेशी, मुकूंद मोदगी, उल्हास शिंदे, नंदकिशोर मोरे, दिलीप शहासने, मारुती तटकरे, दत्तात्रेय कडव, किशोरी सोष्टे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
