घन:श्याम कडू
उरण : नुकतीच उरणहून रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, या वहानतळावर नो पार्किंग जागेत दुचाकी उभ्या केलेल्या दुचाकीला जॅमर लावून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे शिक्षण व नोकरीसाठी नवी मुबंई व मुबंई ठिकाणी जाणाऱ्यांना अत्यंत सोयीचा मार्ग झाला आहे. त्यामुळे प्रवास करणारे दुचाकी लावून पुढील प्रवासासाठी जातात. परंतु दुचाकींची गर्दी होत असल्याने दुचाकीस्वार मिळेल तिथे गाडी पार्क करीत आहेत.
ज्या ठिकाणी तिकीट केंद्र आहे, त्याच्यासमोर दुचाकी लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशा प्रकारचा रस्त्यावर नो पार्किंग लिहिण्यात आला आहे. तरीही दुचाकीस्वार त्याच ठिकाणी दुचाकी लावून पुढील प्रवासास जात आहेत. अशा बेशिस्त लावण्यात आलेल्या दुचाकीला जॅमर लावला जात आहे. दुचाकींचा मालक आल्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. दंड भरल्यानंतर दुचाकीची सुटका केली जाते. तरी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी नो पार्किंगमध्ये दुचाकी न लावता इतर ठिकाणी लावण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.