• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण फोटोग्राफर असोसिएशन संघाने पटकावला प्रथम क्रमांक

ByEditor

Feb 2, 2024

अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे शानदार आयोजन

विनायक पाटील
पेण :
फोटोग्राफीच्या व्यस्त कामातून वेळ काढून मनावरील ताण कमी करण्यासाठी त्याचबरोबर सर्वानी एकत्र येण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन च्या वतीने अलिबाग नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर मर्यादीत षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या सम्पूर्ण स्पर्धेचे अलिबाग फोटोग्राफेर्स असोसिएशनने दिमाखदार नियोजन केले होते.

या स्पर्धेत पेण ए फोटोग्राफर्स संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर व्दितीय क्रमांक कर्जत फोटोग्राफर्स, तृतीय क्रमांक रोहा फोटोग्राफेर्स तर पेण बी फोटोग्राफर्स संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत अष्टपैलू खेळ करून दाखवित पेण ए संघाच्या विनोद बामुगडेने मलोकाविर होण्याचा मान पटकाविला. कर्जत संघाच्या आकाश कोळंबेने उत्कृष्ट फलदांजाचे पारितोषिक पटकाविले तर रोहा ए संघाच्या निलेश टवळे याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे औचित्य साधून फोटोग्राफेर्सच्या क्रिकेट स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्या दिवंगत फोटोग्राफर्स कै. इर्शाद कप्तान यांची पत्नी साजिया कप्तान आणि कै. अमित पिसाट यांच्या पत्नी शिल्पा पिसाट यांचा अलिबाग फोटोग्राफेर्स असोसिएशनच्यावतीने गौरव करण्यात आला. सामन्यांचे उद्घाटन अलिबाग, मुरुडचे आमदार महेंद्र दळवी, ॲड. प्रवीण ठाकूर, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, मुंबई येथील राहूल सेल्सचे मालक हरिष शहा, फोटोग्राफेर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभेकर, वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, काँग्रेसचे उपाध्यक्ष राजा ठाकूर, खंडाळे ग्रामपंचायत सरपंच नाशिकेत कावजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋषिकांत भगत, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. गणेश गावडे, डॉ. राजाराम हुलवान यांनी या स्पर्धेला भेट दिली. या स्पर्धेत रायगड जिल्हातील अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत, रोहे, पाली, नागोठणे, पोयनाड, खोपोली आणि मिक्स इलेव्हन अशा १३ संघाने सहभाग घेतला होता.

स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी अलिबागमधील पत्रकार आणि अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्यात प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. विजेत्या पत्रकार संघाला अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सीए संजय राऊत, रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे, सासवणे ग्रामपंचायत सदस्या संजना पाटील यांच्या हस्ते चषक देवून गौरविण्यात आले. रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद निंबरे, सहसचिव दीपक बडगुजर, खजिनदार जितेंद्र मेहता, कार्यकारिणी सदस्य अविनाश राऊत, निलेश शिर्के, सुशील घाटवळ, अलिबाग फोटोग्राफेर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सुदेश माळी, अमोल नाईक, प्रणेश म्हात्रे सुबोध घरत, सचिन म्हात्रे, सचिन असराणी व सर्व सदस्य उपस्थिती होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!