• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नगरपालिका मैदानावर रंगणार पेण तालुका प्रीमियर लीगचा थरार!

ByEditor

Feb 2, 2024

प्रसाद वासकर उर्फ लल्ला यांचे आयोजन

विनायक पाटील
पेण :
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लल्ला वासकर आणि अनिकेत इलेव्हन पेण कोळीवाडा आयोजित पेण तालुका प्रीमियर लीगचे आयोजन पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दि. 7,8,9,10,11 फेब्रुवारी 2024 रोजी केले असून सात फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ होणार असून बक्षीस वितरण 11 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.

पेण तालुका प्रीमियर लीग मध्ये एकूण 16 संघाने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये डिके इलेव्हन अंतोरे पाटणेश्वर, सात्विक अँड स्वरूप इलेव्हन रामवाडी, जनसेवा सुनामी रायडर्स वडखळ, प्रल्हाद इलेव्हन खारपाले, पराग इलेव्हन गोविले, हर्ष इलेव्हन दूरशेत, प्रथमेश स्मृती साईशा राजवीर इलेव्हन पेण, शिवशक्ती इलेव्हन तिसाई मरूआई गावदेवी कळवे, एस. एस. वॉरियर्स पेण, रॉकी इलेव्हन वॉरियर्स पेण, पृथ्वी मिराज इलेव्हन पेण, प्रेम इलेव्हन पेण, सुमित इलेव्हन डोलवी, जय हनुमान तरणखोप आणि, एस. एस. एस. स्पोर्ट्स पेण या संघांनी सहभाग घेऊन आयोजकांना सहकार्य केले आहे.

या पेण तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 1,20,000/- व चषक, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 60,000/- व चषक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 35,000/- व चषक चतुर्थक क्रमांकाचे पारितोषिक 35,000/- व चषक तसेच मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या लीगमध्ये पेण तालुक्यातील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी व क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांनी ७ ते ११ फेब्रुवारीला नगरपालिका मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजक लल्ला वासकर यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!