• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘नारी महोत्सवा’चे आयोजन

ByEditor

Feb 3, 2024

‘मुलगी झाली हो’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर हिची खास उपस्थिती

विनायक पाटील
पेण :
पेण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी रविवार, दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता ‘नारी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मनोरंजनासाठी हिंदी मराठी कोळीगीतांचा सदाबहार नृत्याचा गुलकंद मराठी आर्केस्ट्रा तसेच महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध ‘मुलगी झाली हो’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर यांची खास उपस्थिती असल्याने महिलावर्ग मोठ्या संख्येने गर्दी करणार असल्याचे समजते. यावेळी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार असून लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवणार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून तसेच मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यक्रम होणार असून नारी महोत्सव कार्यक्रमात पेण तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन पेण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!