• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी

ByEditor

Feb 7, 2024

महाड: महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाडमधील प्रदीप शेट्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड एमआयडीसीतील प्रदीप शेट्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीत रसायनांचे ड्रम असल्याने आगीचा भडका उडाला आहे. ड्रम फुटत असल्याने परिसरात स्फोटाचे मोठ्याने आवाज येत आहे. महाड एमआयडीसी आणि लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे फायर फायटर घटनास्थळी पोहोचले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!