अभय पाटील
बोर्ली पंचतन : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने स्व स्वरूप संप्रदायतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महारक्तदान शिबिराचे आयोजन बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन येथे करण्यात आले असून इच्छुकांनी या शिबिरामध्ये येऊन सर्वश्रेष्ठ दानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रात सध्या सिकलसेल, ऍनिमिया, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, रक्ताचा कर्करोग, किडनी रोग अशा विविध रुगणांची संख्या जास्त प्रमाणात आढळत आहे. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्याना रक्त बाटल्या देण्यासाठी या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या शिबिरामध्ये येऊन रक्तदान करण्याचे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.