• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हरिहरेश्वर मंदिरातील गाभारे राहणार बंद

ByEditor

Feb 9, 2024

मूर्तींच्या वज्रलेप विधीसाठी १८ दिवस बंद
देवांच्या प्रतिमेतून भाविकांना मिळणार दर्शन

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी १८ दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.

वज्रलेप विधी व मंदिरातील इतर दुरुस्ती कामे १५ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत असे एकूण १८ दिवस करण्यात येणार. यामध्ये श्री देव हरिहरेश्वर व श्री देव कालभैरव योगेश्वरी या मंदिरांचे गाभारे बंद राहणार असून या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवांच्या मूर्तींच्या दर्षनाऐवजी केवळ देवांच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे.

मंदिरातील गाभारे बंद ठेवण्यात येणार असल्याने अभिषेक पूजा तसेच कौलप्रसाद, चंदन पुजा बंद असणार आहे. मात्र, घाटावरील विधिवत कामकाज म्हणजे येथे होणारे मरणोत्तर दिवसकार्य अस्थीविसर्जन, पिंडदान त्या संबंधित इतर कामे चालू राहतील अशी माहिती हरिहरेश्वर न्यासाने दिली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!