अनंत नारंगीकर
उरण : चिरनेर-गव्हाण फाटा रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या मालवाहू ट्रेलरला सोमवारी (दि. १२) दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला आहे. सदर अपघातात स्कूटीवरुन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या आहेत. सदर जखमी महिलांना पनवेल येथील रुग्णालयात उपचारार्थ नेल्याची माहिती प्राप्त होत आहे.
बेशिस्त अवजड वाहनांच्या वर्दळीमूळे साई-चिरनेर-गव्हाण फाटा, विंधणे-दास्तान फाटा आणि चिरनेर-खोपटा या प्रवाशी नागरीकांच्या रस्त्यावर रात्री अपरात्री अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात नूकताच खोपटा गावातील निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाला खोपटा रस्त्यावर झालेल्या अपघातात आपले प्राण गमवावे लागले असताना विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील वळणावरील रस्त्यावर सोमवारी (दि. १२) दुपारी ठिक १२ च्या सुमारास मालवाहू ट्रेलरला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघात ट्रेलरवरील कंटेनर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या स्कूटीवर पलटी होण्याची घटना घडली. मात्र दैवबलवत्तर म्हणून स्कूटीवरुन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या आहेत. सदर महिलांना दुखापत झाल्याने त्यांना पनवेल येथील रुग्णालयात उपचारार्थ नेल्याची माहिती प्राप्त होत असून अपघाता दरम्यान काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये व्यक्त केली जात आहे.