• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये लाकडी गोदामाला आग

ByEditor

Feb 13, 2024

घन:श्याम कडू
उरण :
शहरातील बोरी नाका येथील दत्ता रहालकर मैदानाच्या बाजूला असलेल्या लाकडी गोदामाला आग.सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. उरणमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

काही महिन्यांपूर्वी याच परिसरातील रमझान यांच्या मालकीच्या अनधिकृत भंगार गोदामाला भीषण आग लागली होती. त्यांनतर पुन्हा आज आग लागली. याबाबत शासकीय यंत्रणा आर्थिक साटेलोटामुळे कुचकामी ठरताना दिसत आहे. यामुळे उरणचा भोपाळ होण्याच्या मार्गावर असल्याचे जनतेत बोलले जात आहे. उरणमध्ये आजच्या घडीला आगी लागण्याच्या घटनामध्ये वाढ होऊ लागली असताना याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्याचे दुष्परिणाम भविष्यात उरणकरांना निश्चितच भोगावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

आजच्या घडीला आगीत जिवीतहानी झाली नसली तरी एखादी चूकही उरण होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही. तरी प्रशासनाने याची खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!