विनायक पाटील
पेण : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष अंगिकृत शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पेण शहर अध्यक्ष पदी इमरान भाऊमिया बेमजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिव वाहतुक सेनेच्या रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पेण येथे करण्यात आले. वाहतुकदारांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी तसेच कोणत्याही वाहतुकदारांवर अन्याय होऊ नये यासाठी रायगड जिल्ह्यात शिव वाहतूक सेनेचे कार्य उत्तम प्रकारे सुरू आहे. वाहतुकदारांच्या अनेक अडचणी तसेच वाहतुकीशी निगडित सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी शिव वाहतूक सेनाच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

वंदनीय हिन्दूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने “शिव वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य” या संघटनेचे अध्यक्ष महेश पोरे यांनी माझी पेण शहर अध्यक्ष पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी संघटनेचा ऋणी आहे. तसेच माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवून पक्ष वाढीसाठी व वाहतूकीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे इमरान बेमजी यांनी बोलताना सांगितले.