घन:श्याम कडू
उरण : जेएनपीए बंदरातून मोरपिसांची तस्करीचे प्रकरण उघड झाले आहे. यावेळी तब्बल २ कोटी रुपयांची मोरपिसांची तस्करी होत असल्याचे समोर आले असून महसूल सक्तवसुली संचालनालयाने ही मोठी कारवाई केली आहे.
महसूल गुप्तचर संचलनालय विभागाकडून २८ लाख मोरपीस जप्त केले आहे. जेएनपीए बंदरातून ही मोरपिसांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. २ कोटी रुपयांचे मोरपीस चीनला अनधिकृतरित्या पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. पायपुसणीच्या नावाखाली ही तस्करी सुरु असल्याचे तपासाअंती उघड झाले. महसूल गुप्तचर संचलनालयाच्या (DRI) पथकाने चीनकडे पाठवण्यात येणारी मोरपिसांची तस्करी रोखली आहे. या पथकाने एकूण २८ लाख मोरपीस जप्त केले आहे. या प्रकरणात पथकाने निर्यातदाराला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
गेली काही दिवसांपासून ही कारवाई सुरू होती. त्यामध्ये मोरपिसांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. परंतु बाजारातही काही तरुण हातात मोरपिसे घेऊन त्याची खुलेआम विक्री करीत असल्याचे दिसते. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे. जेएनपीए बंदरातून रक्तचंदन, सोने, चरस, गांजा, हत्यारे याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. तरीही बंदरातून तस्करी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.