• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा तालुक्यातील संभे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंच्या हस्ते लोकार्पण

ByEditor

Feb 16, 2024

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
रायगड रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत संभे हद्दीतील मौजे पाले बुद्रुक, संभे, पाले खुर्द गावातील नळपाणी योजना, अंतर्गत रस्ते, साकव, सामजिक सभागृह असे विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या शुभ हस्ते व शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

ग्रामपंचायत हद्दीतील पाले खुर्द गावात जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना एक कोटी चोवीस लाख, रोहा रोड ते गाव रस्ता डांबरीकरण दहा लाख, बौद्धवाडी रस्ता काँक्रीटीकरण – ८ लाख, बौद्धवाडी आरसीसी गटार – ३ लाख, कालव्यापासून शंकर मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण – ७ लाख, हरिभाऊ मोरे यांच्या घराकडे जाणारा रस्ता पेव्हर ब्लॉक रस्ता – ५ लाख, संदिप झोलगे यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण – ३ लाख, अशोक ठाकुर यांच्या घराकडे जाणारा काँक्रीटीकरण रस्ता – ३ लाख, मनोज तुलवे यांच्या घरारजवळ संरक्षण भिंत – १.५ लाख अशा एकूण नऊ विकासकामांचे १ कोटी ६४ लाख ५० हजार रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. तर संभे येथे मुख्य रस्त्याला साकव बांधणे – १०लाख, खालची आळी रस्ता तयार करणे – ३ लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्त करणे व संरक्षक भिंत बांधणे – ५ लाख ४० हजार, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता तयार करणे – ४ लाख अशी एकूण २१ लाख ४० हजार रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पाले बुद्रुक येथे जलजीवन मिशन पाणी पुरवठा – ६५ लाख, शंकर मंदिर सामजिक सभागृह – १७ लाख, शंकर पेव्हर ब्लॉक रस्ता – १० लाख, कोलाड रोहा रोड ते पाले बुद्रुक गाव रस्ता डांबरीकरण – १४ लाख, मारुती महाबळे घरापासून विहिरीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण – १० लाख, आर.सी.सी.गटार – ४ लाख, संरक्षण भिंत मराठी शाळा ते रमेश भगत घर – ३ लाख, विठोबा महाबळे ते गणेश कदम आरसीसी गटार – ३ लाख, बौद्धवाडी स्मशानभुमी – ३ लाख, आदिवासीवाडी स्मशानभूमी – ३ लाख, भवानी मंदिर मोटी ते शंकर मंदिर रस्ता काँक्रीटीकरण – ४ लाख अशी एकूण १ कोटी ३६ लाख रुपये किंमतीची विकासकामांचे उद्घाटन यावेळी अनंत गीते यांचे हस्ते करून त्याचे लोकार्पण करण्यात आले.

सदरच्या ग्रामपंचायत हद्दीतील एकूणच विविध विकासकामे झाली असून यासाठी ५ कोटी १४ लाख रुपयांची तरतूद करून या ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील संभे ग्रामपंचायतीच्या हद्दीत काही करोडो रुपयांची विकासकामांचे उद्घाटन यावेळी ठाकरे गटाचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी आमदार अनिलभाऊ तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, नेते शंकरराव म्हसकर, नंदूशेठ म्हात्रे, लक्ष्मण महाले, शिवराम महाबळे, राजेश सानप, मारूती खांडेकर, गोपीनाथ गंभे, गणेश मढवी, विष्णू लोखंडे, मनोहर महाबळे, ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर महाबळे, ग्रामपंचायत सदस्य नंदेश यादव, मारूती बुवा लोखंडे, चेतना लोखंडे, राजश्री सानप, बबलू सय्यद, माजी सरपंच पांडुरंग महाबळे यांच्यासह ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ महीला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!