प्रतिनिधी
नागोठणे : पेण-सुधागड-नागोठणे विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रसाद भोईर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठणे शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी नागोठणे यांनी केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता नागोठणे भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयुष्मान भारत कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या या आयुष्यमान भारत कार्ड योजनेमध्ये रुग्णांना पाच लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. सदर कार्डचे वाटप हे निःशुल्क करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी केले आहे. तसेच नागोठणे आयटीआय कॉलेजसमोर प्रसाददादा भोईर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच नागोठणे सरकारी हॉस्पिटल व आदिवासी वाडीवर फळे व भेटवस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम होणार आहे.
संध्याकाळी नागोठणे रिलायन्स मैदानावर महिलांसाठी भव्य स्वरूपाच्या जिल्हास्तरीय ‘नमो चषक’ कबड्डी स्पर्धा होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन मोदी, आनंद लाड, श्रेया कुंटे, एकनाथ ठाकूर, अर्पणा सुटे व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.