• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्यात प्रसाददादा भोईर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

ByEditor

Feb 18, 2024

किरण लाड
नागोठणे :
पेण, सुधागड, रोहा विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख, युवकांचे आधारस्तंभ प्रसाददादा भोईर यांच्या 43व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठणे येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले. यावेळी नागोठणे येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसाददादा भोईर यांचा 43वा वाढदिवस नागोठणे विभागात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाने साजरा होत आहे. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीयस्तरावरील लोकांनी गर्दी केली होती.

आज नागोठणे येथील त्यांच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी येथील युवा कार्यकर्ते केतन पोकळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!