• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजनेअंतर्गत महाड तालुक्यात मुठवली शाळेला प्रथम क्रमांक

ByEditor

Feb 22, 2024

मिलिंद माने
महाड :
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या योजनेअंतर्गत महाड तालुक्यातील मुठवली शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून या शाळेला शासनाकडून तीन लक्ष रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे.

राज्य शासनाने चालू वर्षापासून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राज्यभर राबविण्याचे धोरण जाहीर केले आहे त्यानुसार विविध उपक्रमांना शंभर गुणांचे गुणांकन ठेवले आहे त्यामध्ये तालुका जिल्हा विभाग व राज्य या प्रत्येक स्तरावर या उपक्रमांतर्गत बक्षीस ठेवली आहेत. महाड तालुक्यामध्ये मुठवली शाळेला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून या शाळेला शासनाकडून तीन लक्ष रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या योजनेअंतर्गत शाळेतील रंगरंगोटी, वर्ग सजावट परसबाग, कंपोस्ट खत प्रकल्प, तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन, शालेय मंत्रिमंडळ, बँकेचे कामकाज, शैक्षणिक उपक्रम, स्वच्छता यासारख्या विविध स्पर्धा या उपक्रमामध्ये समाविष्ट होत्या. त्यानुसार तालुक्यातल्या मुठवली शाळेने क्रमांक प्राप्त केला.

या उपक्रमासाठी शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे शिक्षक यशवंत घरत, तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी चांदोरकर मॅडम, गट समन्वय सुर्वे सर, केंद्रप्रमुख म्हात्रे व शाळेचे शिक्षक संदीप कदम यांनी या कामी विशेष मेहनत घेतली. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती पुनिता गुरव यांच्या कमिटीने शाळेला भेट दिली. त्यावेळी उपशिक्षणाधिकारी भोपळे, उपशिक्षणाधिकारी शेडगे, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. तुपे व अधीक्षक काकडे मॅडम या भेटीदरम्यान उपस्थित होत्या. या कमिटीने शाळेच्या केलेल्या मूल्यांकनामध्ये मुठवली शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!