• Sun. Jul 27th, 2025 8:52:56 PM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज्यातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

ByEditor

Feb 23, 2024

मिलिंद माने
मुंबई :
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचे धोरण महायुती सरकारने अवलंबले असून त्यानुसार आज पुन्हा एकदा राज्यातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबईमध्ये चालू होत आहे. हे अधिवेशन पाच दिवस चालणार असून त्यानंतर लागलीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरता सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे सत्र मागील महिनाभरापासून चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा एकदा राज्यातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे:

१. कविता द्विवेदी – महापालिका आयुक्त, अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या पदावर
२. डॉ. हेमंत वसेकर – आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे या पदावर.
३. कौस्तुभ दिवेगावकर – प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, पशुसंवर्धन पुणे या पदावर
४. कार्तिकी एन. एस. यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या पदावर
५. मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई या पदावर
६. एम. जे. प्रदीप चंद्र यांचे नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई या पदावर
७. कावली मेघना यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या पदावर.
८. विजय सिंगल महाव्यवस्थापक, बेस्ट यांची नियुक्ती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई या पदावर
९. श्री संजय सेठी यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे या पदावर
१०. पराग जैन नैनोटिया, प्रधान सचिव (परिवहन व बंदरे) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई या पदावर
११. ओ. पी. गुप्ता अप्पर मुख्य सचिव (व्यय) वित्त विभाग यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग या पदावर
१२. राजेश कुमार यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग या पदावर

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!